Share

Kisi ka Bhai kisi ki Jaan | सलमान खानच्या ‘किसी की भाई किसी की जान’ चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर

मुंबई: बॉलीवुड सुपरस्टार सलमान खान अनेक दिवसापासून कोणत्याही चित्रपटात दिसला नाही आहे. त्यामुळे सलमान खानचे चाहते त्याच्या येणाऱ्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहे. चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून सुपरस्टार सलमान खान पुढच्या वर्षी अनेक धमाकेदार चित्रपट घेऊन येणार आहेत. कारण सलमान खानने त्याच्या येणाऱ्या आगामी चित्रपटांची रिलीज डेट जाहीर केली आहे. दरवर्षी ईद दरम्यान सलमान खानचे चित्रपटाची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू असते. कारण सलमान खान ईदच्या दरम्यान आपल्या चाहत्यांसाठी नवीन चित्रपट घेऊन येतो. प्रेक्षकांची ही बहुप्रतीक्षा लवकरच संपणार असून पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमान खान आपला आगामी चित्रपट ‘किसी की भाई किसी की जान’ सह प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘किसी की भाई किसी की जान’ चित्रपट पुढच्या वर्षी ईदला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवरून त्यांच्या येणाऱ्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. सलमानने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर ‘किसी के भाई किसी की जान’ चे पोस्टर शेअर केले आहे. सलमानने या पोस्टला कॅप्शन दिले आहे, ” टायगर 3 दिवाळी 2023 आणि किसी का भाई किसी की जान ईद 2023 चला, या चित्रपटांसह ईद आणि दिवाळी साजरी करूया.” सलमान खानने शेअर केलेल्या या पोस्टनुसार किसी का भाई किसी की जान हा चित्रपट पुढच्या वर्षी 21 एप्रिल म्हणजेच ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

किसी की भाई किसी की जान चित्रपटातील इतर कलाकार

किसी के भाई किसी की जान चित्रपटामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडे सुद्धा दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये शेहनाज कौर गिल, दग्गुबदी व्यंकटेश, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल आदी कलाकार दिसणार आहे.

सलमान च्या टाईगर 3 चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

अभिनेता सलमान खान याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टायगर 3 या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. आणि त्याचबरोबर चित्रपटाची रिलीज डेट देखील शेअर केली आहे. यापूर्वी हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार होता. पण आत्ता नवीन आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट आता पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. सलमान खानने शेअर केलेल्या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टर मध्ये या चित्रपटाची रिलीज तारीख दाखवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई: बॉलीवुड सुपरस्टार सलमान खान अनेक दिवसापासून कोणत्याही चित्रपटात दिसला नाही आहे. त्यामुळे सलमान खानचे चाहते त्याच्या येणाऱ्या आगामी चित्रपटाची …

पुढे वाचा

Entertainment