मराठमोळ्या अंदाजात किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स, पहा व्हिडीओ…

किशोरी

मुंबई: अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी उत्तम अभिनय साकारलेला आहे. त्याच्या सौंदर्यता आणि अभिनयाच्या जोरावर त्या खूप लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यांच्या चाहता वर्ग देखील मोठा आहे. आजही तरुणाईला लाजवतील इतका उत्साह त्यांच्यात पाहायला मिळतो. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे, त्यामध्ये त्या चक्क नऊवारीमध्ये ‘गोरे गोरे गालों पे है’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओ मध्ये त्यांनी राखाडी रंगाची नऊवारी साडी आणि गळ्यात पांढऱ्या मोत्यांची माळ यामध्ये त्या खुपचं सुंदर दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर चाहते लाईक्स तर करतचं आहेत, शिवाय भरभरून कमेंट्सही करत आहेत. त्या आजही मनोरंजन मनोरंजन क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत. अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.

किशोरी शहाणे बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये सुद्धा त्यांना प्रचंड पसंती मिळाली होती. त्यांच्या चाहता वर्ग देखील अधिक असल्याने त्यांनी बिग बॉसच्या फायनलमध्ये स्थान मिळवलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

IMP