तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी घेतला समाचार

टीम महाराष्ट्र देशा : कीर्तनातून गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी निवृत्ती महराज देशमुख (इंदुरीकर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. मात्र तृप्ती देसाई यांनी ही मागणी केल्यापासून इंदुरीकरांच्या समर्थकांकडून त्यांना धमक्या, अश्लील शिवीगाळ करण्यात येत आहे. या इंदुरीकर समर्थकांना अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी विचारांची लढाई लढण्याचा सल्ला दिला आहे.

यावेळी बोलताना किशोरी शहाणे म्हणाल्या, ”मला अभिमान आहे की मी भारताची नागरिक आहे, इथे स्त्रीची पूजा केली जाते. आपल्या देशात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण आदराने वागवत असतो. मात्र जेव्हा कोणतीही स्त्री चुकीची वागत आहे किंवा तिचे कार्य चुकीचे आहे असे वाटत असेल तर तिच्या कामावर टीका करताना खूप वाईट आणि अश्लील शब्द वापरले जातात. तुम्हाला जर कोणी पटत नसेल तर तुम्ही त्या स्त्रीच्या विचारांची टीका करा. सभ्य शब्दातही टीका करू शकता. शेवटी हे विचारांचे मतभेत आहे त्यासाठी अश्लील भाषा वापरणाऱ्यांचा मी निषेध करते.

Loading...

तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईचे काम कोणाला अवाडेल किंवा नाही आवडणार. पण त्याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावर टीका करताना ती अश्लील शब्दात कराल. सभ्यतेने त्यांच्या विचारांचा निषेध करू शकता. त्याने तुमचीही प्रतिष्ठा जपली जाते. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

दरम्यान, स्त्री संग सम तिथीला केला तर मुलगा आणि विषमतिथीला केला तर मुलगी होते असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु असताना राज्यभार्तून त्यांच्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....