Share

Kishori Pednekar | “एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसांनीच भाषण लिहून दिलं होतं”, किशोरी पेडणेकरांचा घणाघात

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचं लक्ष लागलेला दसरा मेळावा अखेर काल पार पडला. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सभा झाली. त्याचवेळी बीकेसी ग्राऊंडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला ठाकरे कुटुंबातील अनेकांनी हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांनी लांबलचक भाषण केले. शिंदेंच्या भाषणावर राज्यभारत टीका केली जात असतानाच शिवसेना नेत्या किशारी पेडणेकर यांनी देखील टीकास्त्र सोडलं आहे.

किशोरी पेडणेकर यांचा घणाघात :

आमचे पैसे, आमची भाकरी, विचार मात्र उद्धवजींचे ऐकायला आलोय, असं अनेकांनी शिवाजी पार्क मध्ये सांगितल, स्वतःहून येणं आणि माणसं आणणं यात फरक असतो, असं किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या. काल शिवतिर्थावरचा मेळावा अभुतपूर्व मेळावा असल्याचे त्या म्हणाल्या. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर तर स्टेज वर डुलक्या काढत होते. या सगळ्यांना दिसून आले आहे. तर प्रत्येक घराण्यातील भांडणं चव्हाट्यावर येतातच मात्र उद्धव ठाकरे यांनी कधी नातेवाईकांचा विरोधही केला नाही आणि भांडवल ही केलं नाही. ते काल शिंदेंकडून होताना दिसून आल्या असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

निखील वागळे यांचं ट्विट :

जेष्ठ पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagale) यांनी कालच्या मेळाव्यावर भूमिका स्पष्ट केली. वागळे म्हणाले, “एकनाथ शिंदेचं भाषण फडणवीसांनी लिहून दिलं होतं काय? मध्येमध्ये फडणवीसांप्रमाणे ओरडतही होते. ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या,वाण नाही पण गुण लागला!. न्यायालयाचा निकाल काहीही लागो, खरी शिवसेना कोणती हे काल स्पष्ट झालं. एकनाथ शिंदेनाही ते कळलं असेल. गुवाहाटीत सुरु झालेला खोक्यांचा खेळ काल बिकेसीवरही दिसला. आता महापालिका निवडणुकांपर्यंत या खेळाला ऊत येईल. मतदार त्याला बळी पडले नाहीत तर

भाजपला शिंदे सेनेत स्वारस्य उरणार नाही. शिवसेनेचा मेळावा शिंदे सेनेपेक्षा अधिक प्रभावी आणि उत्स्फूर्त होता. एकनाथ शिंदेंचं लिहून आणलेलं भाषणही सुपरफ्लॅाप ठरलं. पैशांनी उत्साह विकत घेता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं!”

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचं लक्ष लागलेला दसरा मेळावा अखेर काल पार पडला. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now