‘कोण अमृता फडणवीस? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था’; पेडणेकरांची खोचक टीका

amruta fadnavis vs kishori pednekar

मुंबई : पुणे जिल्ह्यात कोरोना निर्बंध अद्यापही कायम ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण काहीसे अधिक असले तरी शहरी भागात कोरोनाचे प्रमाण हे कमी असल्याने शहरी भागांमध्ये कोरोना निर्बंध कमी करावे अशी मागणी पुण्यातील व्यापारी, महापौर मुलीधर मोहोळ यांच्यासह भाजप नेते करत आहेत.

आता यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकारला सवाल केला आहे. पुण्यात कोरोनाचा दर चार टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळं इथं सगळं काही सुरळीत होण्याची गरज आहे. असं असताना शहरावर अजूनही बंधनं का आहेत, मला कळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, मुंबईला एक न्याय आणि पुण्याला एक न्याय हे अयोग्य आहे. कोरोनाचे रुग्ण आता कमी झालेत. लोक मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत आहेत. त्यामुळे याठिकाणी निर्बंध शिथिल करायला हवेत.

यावर आता शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य करत अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. पुढे पेडणेकर यांनी, आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही असं म्हणत अधिक बोलणं टाळलं.

महत्त्वाच्या बातम्या