Kishori Pednekar | मुंबई : अनेक नेत्यांवर घोटाळ्या केल्याचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyaa) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर एसआरए घोटाळ्याचा आरोप केला आहे. यावरुन किशोरी पेडणेकर संतापल्या असून त्यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे.
किशोरी पेडणेकर यांनी गोमाता परिसरातील गाळ्यांची पहाणी केली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत एक कुलूप देखील नेला होता. यावेळी किरीट सोमय्या यांनी केलेल्या आपोरावर जर हा गाळा माझा असेल तर मी इथे आता टाळा लावेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
कोर्टामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरू असून कोर्टाने स्पष्टपणे लिहून दिलं आहे की माझा त्यात समावेश नाही. यामध्ये ते स्वत: किशोरी पेडणेकर यांचा एसआरएने स्पष्ट केलं आहे’ असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज किशोरी यांची चौकशी होणार आहे. यावेळी, एक तर तोंड बंद कर नाहीतर बोलायचं नाही, असा सोमय्यांचा डाव आहे, त्याला मी बळी पडणार नाही, माझं तोंड बंद करणार नाही, असं पेडणेकर म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Freddy | कार्तिक आर्यन च्या ‘फ्रेडी’ चित्रपटाचे फर्स्ट लूक रिलीज
- Ram Kadam | “महाविकास आघाडीच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा”; ‘त्या’ प्रकरणावरून राम कदम यांची मागणी
- Abdul Sattar | “चंद्रकांत खैरे लंगडा माणूस” खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अब्दुल सत्तारांचा पलटवार
- T20 World Cup । झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा खेळाडू ढसाढसा रडला, व्हिडिओ व्हायरल
- Maharashtra Weather Update | राज्यात थंडीची चाहूल, तर कोकणात सर्वत्र पसरली धुक्यांची चादर