मुंबई : बंडखोर नेते रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर एका खासगी वृत्तवाहिनीशी बातचीत करताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. आदित्य ठाकरे यांच्या बोलण्यावर आक्षेप नोंदवत नाराजीही व्यक्त केली. रामदास कदम यांच्या आरोपांना आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “दोन दिवसांपूर्वी रामदास कदम पोरं कुठं जायची ती जाऊदे, मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहील असं म्हणत होते. आज तेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करत आहेत. भाई, तुम्हाला जायचंय तर जा पण मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंवर आणि आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करू नका”. पुढे त्या असेही म्हणाल्या कि, “आम्ही कोणाचा आदर्श ठेवायचा? निष्ठावंत म्हणून कोणाकडे बघायचं? शिवसेना सोडून जायचं असेल तर नक्कीच जा, पण ज्या बाळासाहेबांनी आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी तुम्हाला जी पदं दिली, त्यांचा मान ठेवा”.
महत्वाच्या बातम्या:
- Imtiaz Jalil : गुगलने संभाजीनगर उल्लेख केल्याने इम्तियाज जलील संतापले, थेट गुगललाच विचारला जाब
- uday samant : एकनाथ शिंदे दिल्लीला गेले मात्र सगळं लक्ष महाराष्ट्रात – उदय सामंत
- Udayanraje Bhosale । “संजय राऊत भगवान है…”; उदयनराजे संतापले
- Lok Sabha : शिंदे गटात सामील झालेल्या 12 खासदारांची पुढची रणनिती, लोकसभा अध्यक्षांकडे केल्या तीन मागण्या
- Om Birla : शिंदे गटात सहभागी झालेल्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<