Share

Kishori Pednekar | “उद्धव ठाकरेंची कोंडी करून, शिवसेना पक्षालाच…”; किशोरी पेडणेकरांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत. त्यामध्ये अंधेरी (पूर्व) पोट निवडणूकीचं वारंही सगळीकडे घुमत आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये वेगळंच युद्ध पाहायला मिळतं आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिकेने त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारला नाहीय. यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांवर चांगलाच हल्ला केला आहे.

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ?

काही कारणास्तव तुम्ही काम सोडणार असाल, तर पैसे भरून राजीनामा देऊ शकता. ऋतुजा लटकेंनी स्वइच्छेने राजीनामा दिला आहे. त्यांची महापालिकेतील वर्तणूकही चांगली होती. मात्र, एखाद्या लिपीकासाठी शिंदे गट इतका अट्टहास का करत आहे?, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांना केला आहे. कायद्याच्या अडचणी निर्माण करून सर्व बाजूंनी उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवसेना पक्षालाच संपवून टाकण्याचा विडा शिंदे गट आणि भाजपाने उचलला असल्याचं म्हणत पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे. पुढे बोलताना त्या असंही म्हणाल्या की राजकारणाचा सुसंस्कृतपणा संपत चालला आहे.

तसेच, शिवाजी पार्कवेळेही महापालिकेने अरेरावी केली. पण, न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पालिकेला तोंडावर पडण्याची वेळ आली. काही अधिकाऱ्यांमुळे पालिकेच्या १५० वर्षाचा इतिहास पुसला जात आहे. लटकेंच्या जागी अन्य उमेदवार दिल्यास त्याला पराभूत करण्याचा काहींना साक्षात्कार होतोय, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे आणि भाजपवर उमेदवाराला डावलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. ऋतुजा लटके यांच्यावर शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावर्षी अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले. त्यानंतर येथे पोटनिवडणूक होत आहे. लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या बृहन्मुंबई कॉर्पोरेशनमध्ये कर्मचारी आहेत. त्यांनी निवडणूक नियमांनुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे. याप्रकरणी आज (गुरुवार) न्यायालयात सुनावणी होणार असून, न्यायालय काय निर्णय देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत. त्यामध्ये अंधेरी (पूर्व) पोट निवडणूकीचं वारंही सगळीकडे घुमत आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now