Share

Kishori Pednekar | ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटाला इशारा, म्हणाल्या…

मुंबई : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून, ‘मशाल’ चिन्ह दिलं आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आप-आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच शिवसेना नेते आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ?

मशाल निशाणी ही 1985 ला शिवसेनेला मिळाली होती. त्यावेळी छगन भुजबळ त्यावर निवडणूक लढले होते. आज 2012 ला बाळासाहेब गेल्यानंतर जी मशाल स्मृतीस्थळावर लावण्यात आली होती. ती कायम धगधगते आहे. ते चिन्ह आम्हाला मिळाले आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. आज पेडणेकरांनी शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला आहे.

आम्ही निवडणूक आयोगाकडे तीन नावे आणि चिन्हे दिली होती. त्यापैकी मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आम्हाला निवडणूक आयोगाने दिले आहे. हे नाव आणि चिन्ह तात्पुरते असली, तरी शिवसैनिकांच्या मनाला उभारी देण्याचे काम करणार आहेत. आज वाईट पद्धतीने बाळासाहेबांच्या पक्षाला बुडवण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, जेव्हा नियतीचे उत्तर देते, तेव्हा सर्वच शांत होतात. आज निशाणी जी मिळाली आहे. हा नियतीचाच प्रकार आहे.

त्यामुळे विरोधकांचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत

पुढे बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, शिवसैनिक निखारा आहे, तो कधीही पेटला असता. मात्र, उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाने ते होऊ दिले नाही. त्यामुळे विरोधकांचे राष्ट्रपती राजवट लावण्याचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात जे काम प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून, ‘मशाल’ चिन्ह दिलं आहे. आयोगाच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now