Kishori Pednekar | ‘दोन दसरा मेळावा होत असल्याचे दु:ख’ म्हणणाऱ्या रामदास कदमांवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार म्हणाल्या…

मुंबई : राज्यात सध्या राजकीय वातावरण खूप तापलेलं दिसून येतं आहे. तर दुसरीकडे शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) दसरा मेळाव्याची (Dasara Melava) तयारी करत आहे. दोन्ही गटाकडून शक्तीप्रर्शन करण्यात येत आहे. तसेच शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर आहे. तर ठाकरे गटाचा दादरमधील शिवाजीपार्कवर आहे. त्यामुळे दोन्ही गटातील नेते एकमेकांवर तुटून पडल्यासारखे आरोप, टोलेबाजी करत आहेत. शिंदे गटातील रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दसरा मेळाव्यावरून दसरा मेळावा होत असल्याने मला दुख होत असल्याचं वक्तव्य केलं होतं. आता त्यावरून शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर  ?

किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. दसरा मेळाव्याबाबत त्यांना काय वाटतं हे कोणीही विचारलं आहे का? भर विधानसभेत ते बोलले होते, ‘माझ्या मुलाला उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं. मी इतेक वर्ष शिवसेनेत काम केलं. त्यामुळे मी समाधानी आहे.’ पण नंतर उलटे ढेकर देणारे हेच रामदास कदम होते. त्यामुळे त्यांनी जिथे जायचं तिथे जावं, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

रामदास कदम यांचे वक्तव्य 

यंदा दोन दसरा मेळावे होत आहेत. पण मी त्यावर समाधानी नाही. आम्ही रक्ताचं पाणी करून पक्ष उभा केला आहे. शेकडो केसेस आम्ही अंगावर घेतल्या. किती तरी यातना आम्ही भोगल्या. त्यामुळे दोन मेळावे बघून दुःख होत असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, येत्या 5 सप्टेंबरला म्हणजेच गुरूवारी शिंदे गट आणि ठाकरे गटाचा मेळावा वेगवगेळ्या ठिकाणी दोन्ही दसरा मेळावे होणार आहेत. त्यामुळे कोणाच्या मेळाव्यावा लोक पसंती देतात हे पाहणं उत्सुकत्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :

मुंबई : राज्यात सध्या राजकीय वातावरण खूप तापलेलं दिसून येतं आहे. तर दुसरीकडे शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics