मुंबई : भाजप (BJP) पक्षाचे नेते नितेश राणे(Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंना मिळालेल्या ‘मशाल’ चिन्हावर बोलताना एक वक्तव्य केलं. “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या माणसाचं चिन्ह हे मशाल नाही कारण त्याच्यातली आग कधीच विझली आहे. खरं तर आईस्क्रीमचा कोन मिळाला आहे जो थंड पडलेला आहे,” असं नितेश राणे म्हणाले. “मशाल नाहीच आहे की आइस्क्रीमचा कोन आहे. उद्धव ठाकरेचं मशाल हे चिन्ह होऊच शकत नाही. त्या माणसामधली आग संपलेली आहे.” यावर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ?
तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही का? तुम्ही भारतीय नागरिक म्हणून योग्य आहात का? असे खोचक सवाल करच किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. पडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “विंद्र वायकर यांनी वास्तव सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दिलेले चिन्ह हे मशाल आहे. त्यांच्या (शिंदे गट) निवडणूक चिन्हाबद्दल लोक ढाल कोणाची आणि तलवार कोणाची, असे म्हणत आहेत. मात्र आम्हाला मिळालेले मशाल हे निवडणूक चिन्ह शिवसेनेचेच होते. हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिलेले आहे. तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही का? तुम्ही भारतीय नागरिक म्हणून योग्य आहात का? असे सवाल किशोरी पेडणेकर यांनी केले आहेत.”
दरम्यान, नितेश राणेंच्या याच वक्तव्यावर शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनीही भाष्य केलं आहे. ती मशाल नसून कोन आहे असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते तोंडात घेऊन बघावं. तोंडात घेतल्यानंतर तो आईस्क्रीमचा कोन आहे की मशाल आहे हे चटके बसल्यानंतर कळू शकतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Rahul Gandhi | “सिलेंडरची किंमत ४०० रुपये होती तेव्हा पंतप्रधान तक्रार करायचे, आता…”, राहुल गांधींनी विचारले सवाल
- Rohit Pawar | दिवाळी पहाट कार्यक्रमावरून रोहित पवारांचा शिंदे सरकारला टोला
- Ajit Pawar | “…तो पर्यंतच शिंदे सरकार टिकणार”, अजित पवारांचं भाकीत
- Rupali Thombre | चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानाला रुपाली ठोंबरे पाटलांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या…
- BJP | भाजपला धक्का! मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप