Kishori Pednekar | मुंबई : आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे.गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यांच्या आरोपाला उत्तर देताना बच्चू कडू यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा एक तारखेला सात ते आठ आमदार घेऊन वेगळा निर्णय घेऊ, असं कडू म्हणाले आहेत. अशातच रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादामध्ये ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी उडी घेतली आहे.
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar)
सध्या राज्यात नौटंकी सुरू आहे. सी ग्रेडपासून वर येण्यासाठी काय काय सुरू आहे. हे आपण पाहतच आहोत. ते तर नौटंकी दाम्पत्य आहे, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी रवी राणा यांच्यावर हल्ला केला आहे. पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
बच्चू कडू हे चांगले व्यक्तिमत्त्व आहे. ते राणांना पुरून उरतील, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी एकप्रकारे बच्चू कडू यांना आपला पठिंबा दर्शवला आहे. यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं असल्याचं पाहायला मिळालं आहे.
तसेच, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. यावरही पेडणेकर यांनी भाष्य केलं आहे. आम्ही रस्त्यावर उतरलोय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. शेतकऱ्यांसाठी जे करायला हवं ते आमचे नेते करत आहेत. आमचे दौरे घड्याळ्याच्या काट्यावर मोजले जात आहेत. पण आमचे दौरे घर टू ऑफिस आणि ऑफिस टू घर नाहीत,असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs NED T20 World Cup | विराट, रोहित आणि सूर्यकुमारचे अर्धशतक, नेदरलँड्ससमोर 180 धावांचे लक्ष
- PM Kisan Mandhan Yojana | शेतकऱ्यांना मिळवता येणार दरमहा 3000 रुपयांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या
- Ravichandran Ashwin। मोहम्मद नवाजचा चेंडू वाईड गेला नसता, तर मी निवृत्ती घेतली असती, अश्विनचे धक्कादायक विधान
- IND vs NED T20 World Cup | केएल राहुल बाद नव्हता! रोहित स्वार्थी कर्णधार, सोशल मीडियावर टीका
- NTRO Job Alert | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये NTRO विविध पदांसाठी बंपर भरती