Share

Kishori Pednekar | पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल, “तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे जातो?”

मुंबई : आपल्याला माहित असेल, एक ऋतू सपंल्यानंतर दुसरा ऋतू सुरू होतो. आता हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. परंतू सध्या हिवाळा ऋतूमध्ये पाऊस कोसळताना दिसत आहे. सोमवारी पुण्यामध्ये (Pune Rain) तर गाड्या वाहून जात होत्या, इतका पाऊस (Rain) पडला. या पावसामुळे झालेल्या नुकसानावरुन पुणे महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपवर (BJP) जोरदार टीका करण्यात येत आहे. याबाबत विचारले असता, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, “पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही.” त्यांच्या याच वक्तव्यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी (Kishori Pednekar) पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला आहे.

किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया 

देवेंद्र फडणवीसांचा हा समंजसपणा मुंबईमध्ये (Mumbai) मुसळधार पावसानं पाणी साचल्यानंतर कुठे जातो?, असा खोचक सवाल पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी प्रसार माध्यांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

पेडणेकर म्हणाल्या, पुण्याची सत्ता भाजपकडे आहे, तर मुंबईची सत्ता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) या पक्षाकडे आहे. मग दोन्ही ठिकाणी वेगळा न्याय का?, पावसाळ्यात उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप करण्यात येतात, तेव्हा फडणवीस समंजसपणा का दाखवत नाहीत, असेही त्यांनी म्हटलं आहे. पुण्यासाठी दाखवलेला समंजसपणा मुंबईसाठीही दाखवा, असा सल्ला देवेंद्र फडणीसांना पेडणेकरांनी दिला आहे. पाऊस कधी पडावा, कसा पडावा, किती मिलीमीटर पडावा, हे 100 टक्के आपल्या हातात नसल्याचंही पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य 

पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, पण जो पाऊस पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. सोमवारी पुण्यात पडलेल्या पावसाने मागील 10 वर्षांचा विक्रम मोडला आहे. मागील 24 तासांत पुण्यात पडलेला पाऊस सर्वाधिक आहे. हे प्रमाण 100 वर्षांच्या रेकॉर्डपेक्षा थोडं कमी आहे. इतका पाऊस पडल्यानंतर पाणी तुंबणारच आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : आपल्याला माहित असेल, एक ऋतू सपंल्यानंतर दुसरा ऋतू सुरू होतो. आता हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. परंतू सध्या हिवाळा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now