मनसेच्या राज्य सरचिटणीसपदी किशोर शिंदे यांची नियुक्ती

पुणे : येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन, मनसेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस (विशेष जवाबदारी – जनसंघटना, प्रचार-प्रसार व अतिरीक्त कारभार पिंपरी-चिंचवड) पदाची जबाबदारी माजी नगरसेवक तसेच गटनेते अॅड.किशोर शिंदे यांच्याकडे सोपवली आहे.ही नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली आहे.

किशोर शिंदे हे मनसेचे पुण्यातील माजी नगरसेवक तसेच गटनेते होते.  ते राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय असल्याचे म्हंटले जाते. आता किशोर शिंदे यांच्यावर पक्ष संघटनाची मोठी जबाबदारी असणार आहे.

 

‘सावजाची शिकार मीच करीन’ – उद्धव ठाकरे

You might also like
Comments
Loading...