चंद्रकांत पाटलांच्या ऑफरला किशोर शिंदेनी दिले असे उत्तर

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूडमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे प्रतिस्पर्धी उमेदवार किशोर शिंदे यांची लढत सर्वाधिक चर्चेत होती. मात्र चंद्रकांत पाटील यांनी नसेचे प्रतिस्पर्धी उमेदवार किशोर शिंदे यांना चक्क भाजप प्रवेशाची ऑफर दिली आहे. त्यांच्या बोलण्याच्या व्हिडीओही सकाळपासून समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे दोघेही मतदारांना आवाहन करत मतदारसंघात कार्यकर्त्यांसह फिरत होते. त्यावेळी समोरासमोर आल्यावर पाटील यांनी शिंदे यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, किशोर तुझ्यासारख्या व्यक्तीची भाजपमध्ये गरज आहे. त्यावर शिंदे यांनी तात्काळ उत्तर दिले की, ‘तुमच्या पक्षात कर्तृत्ववान खूप आहेत. तुम्ही आमच्यासोबत युती करा. आम्ही येतो तुमच्यासोबत. ” असेही ते म्हणाले. दरम्यान, कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तर मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

चंद्रकांत पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते असून प्रदेशाध्यक्ष आहे. परंतु, जनतेतून निवडून आल्याशिवाय मंत्रिमंडळात ‘नो एन्ट्री’ या मोदी-शाह धोरणांमुळे पाटलांना विधानसभेच्या रिंगणात उतरावे लागले. त्यानुसार त्यांनी कोथरूड मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे निश्चित झाल्यानंतर या मतदार संघातील लोकांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर त्यांनी विद्यार्थी परिषदेचा संघटनमंत्री असताना मी पुण्यात इतक्यावेळा गेलो आहे की, पुणे, कोथरुड मला जितके माहित आहे. तितके कोणालाच माहित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे गेली बारा वर्षे मी पुणे पदवीधरचाच आमदार आहे. तसेच आमदार, महसूलमंत्री, पालकमंत्री आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी अनेकदा पुण्याला जातो. त्यामुळे पुणेकर मला परका समजणार नसल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोथरुड मतदारसंघात बाजी कोण मारणार हे स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...

 

Loading...

 

Loading...