26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार किसान सभेची ट्रॅक्टर रॅली

Kisan Sabha's tractor rally to hit the Collector's office on January 26

औरंगाबाद : लालबावटा शेतमजूर युनियन व किसान सभेचे जथ्थे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन 10 दिवसांनंतर परत आल्यानंतर सध्या रोज गावागावात सभा घेण्यात येत आहेत.दिल्ली आंदोलनाचे अनुभव सांगणे व 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीची तयारी करणे हा याचा उद्देश आहे.आज फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे जाहीर सभा झाली. कॉ. काकासाहेब तायडे अध्यक्षस्थानी होते.

तीन शेती कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून २६ जानेवारी रोजी हजारो ट्रॅक्टरची रॅली दिल्लीमध्ये निघणार आहे. देशभर जिल्हा व तालुका पातळीवरही ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले असून औरंगाबाद जिल्ह्यात 26 जानेवारी रोजी कलेक्टर ऑफिस वर त्यात करण्यात आले आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन आज आळंदी येथे झालेल्या सभेत करण्यात आले.

आजच्या सभेत किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अशोक जाधव जिल्हा सचिव काँग्रेस कैलास कांबळे लालबावटा शेतमजूर युनियन चे जिल्हाध्यक्ष काँग्रेस प्राध्यापक राम आहे की व जिल्हा सचिव कांबळे गणेश कसबे तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सलामी यांची भाषणे झाली यांनी सूत्रसंचालन केले तर इरफान शेख यांनी आभार मानले दिल्ली येथे गेलेल्या जत्रेतील जात्यात सहभागी झालेले कॉम्रेड अशोक जाधव यांनी दहा दिवसाच्या लक्षात आलेले विविध अनुभव यावेळी सांगितले. 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीत आळंद येथून ट्रॅक्टर काढण्याचे नियोजन आजच्या सभेनंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आले. चार दिवसापूर्वी आळंदी येथे आत्महत्या केलेले तरुण शेतकरी पायगव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट जाहीर सभेनंतर किसान सभा व शेतमजूर युनियनच्या कार्यकर्त्यांनी घेतली.

महत्वाच्या बातम्या