विराट मोर्चानंतर देखील शेतकऱ्यांच्या मागण्या अपूर्णच ; किसान सभा पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

blank

टीम महाराष्ट्र देशा : वन हक्क दावे निकाली काढा, वन पट्ट्यांची मोजणी करा, यांसह विविध मागण्या घेऊन अनवाणी पायाने शेतकऱ्यांनी काढलेल्या विराट मोर्चाला २ महिने पूर्ण होऊन देखील यांची एकही मागणी पूर्ण झालेली नाही त्यामुळे आता किसान सभा पुन्हा एकदा आक्रमक होत आंदोलनाच्या तयारीत आहे.

प्रलंबित दावे तत्काळ निकाली काढण्याचं आश्वासन देऊन 13 मार्च रोजी सरकारने विराट लाल वादळाला माघारी पाठवलं. नाशिकच्या पेठ तालुक्यातून साधारणतः 1500 आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते, मात्र आजही त्यांच्या पदरी निराशा आहे.

गावात ना मोजणी सुरु आहे, ना सरकारी अधिकाऱ्यांनी संपर्क साधलाय, त्यामुळेच पुन्हा एकदा लढाईचा निर्धार आदिवासी बांधवांनी केला आहे.