‘किसान आंदोलन हे काँग्रेस पुरस्कृत देशव्यापी अराजक माजविण्याचे षडयंत्र’, भाजपचा आरोप

atul bhatkhalkar

मुंबई: गेल्या कित्येक महिन्यापासून कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला काँग्रेस पक्षानं पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र यातच आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शेतकऱ्यांना पंजाबबाहेर आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. ‘पंजाब सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. त्यामुळे राज्यात कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणं टाळावं’ असं आवाहन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केलं आहे. दरम्यान यावरूनच भाजपचे अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर निशाना साधला आहे.

मुख्यमंत्री कॅ.अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना पंजाबबाहेर आंदोलन करण्याचा दिला सल्ला दिला आहे. किसान आंदोलन हे काँग्रेस पुरस्कृत देशव्यापी अराजक माजविण्याचे षडयंत्र आहे, त्याचा हा पुरावा. पंजाबात सत्ता असल्यामुळे तिथे आंदोलन नको बाकी देशात आग लागली तरी चालेल असा हा कुटील डाव. असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन राज्याच्या हिताचं नाही. यामुळे राज्याच्या आर्थिक विकासावर विपरित परिणाम होत आहे. दिल्ली आणि हरयाणात आंदोलन करणं योग्य आहे. असे मत कॅ.अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केले आहे. यावरूनच भाजपने कॉंग्रेसवर निशाना साधला आहे.

महत्वाच्या बातम्या