सुशांतच्या आठवणीत कीर्ती सेननने शेअर केली भावूक पोस्ट

कीर्ती सेनेन

मुंबई : १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्यामुळे बॉलिवूड मध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली असून चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. अत्यंत प्रभावी व हुशार व्यक्तिमत्व असलेल्या सुशांतने अचानक मुंबईतील बांद्रामध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नुकतेच या प्रकरणाला आता १ पूर्ण होईल, याकरिता सध्या त्याचे अनेक चाहते, सेलेब्रिटी त्याच्या आठवणीमध्ये भावूक झाले. आता अभिनेत्री कीर्ती सेननने सुशांत काही जुन्या आठवणी सोशल मिडीयावर शेअर केल्या आहेत.

कीर्तीने ‘राबता’ या चित्रपटातील सुशांतचे काही सीन्स एका व्हिडीओच्या स्वरूपात शेअर लिहिले की, ‘तन लडे, तन मुक जाये… रुह जुडे, जुडी रेह जाये…’ , मला विश्वास आहे की आपण लोकांना भेटतो त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं. माझा राबता हा सुशांत, दिनो आणि मॅडॉक फिल्सशी असाच होता. चित्रपट येतील जातील. पण प्रत्येक चित्रपटाशी जोडलेल्या आठवणी असतात.’

पुढे ती म्हणते की, जे संबध आपण तयार करतो, जे क्षण आपण जगतो ते आपल्या सोबत कायम राहतात. ‘राबता’ माझा सगळ्यात जास्त लक्षात राहणारा अनुभव होता आणि कायम माझ्या हृदयाजवळ राहील. माहित नव्हतं हा आपला पहीला आणि शेवटाचा ठरेल.’ अशा शब्दांत क्रितीने भावूक होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कीर्ती आणि सुशांतने २०१७ साली आलेला चित्रपट ‘राबता’ साठी एकत्र काम केलं होतं. चित्रपटाला आता ४ वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यामुळे कीर्तीने सुशांतसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. या  चित्रपट गाण्यांनी आणि सुशांत, कीर्तीच्या केमिस्ट्रीने अनेकांची मनं जिंकली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IMP