किर्तनकार ,गावपातळीवरच्या भजनी मंडळांना राज्य सरकारने मदत करावी – भाजपा

uddhav thackeray

मुंबई : समस्त मानवी जिवावर उठलेल्या कोरोना संकटात राज्य सरकारने एकदमडी रुपया , कुणाला मदत केली नाही. मात्र जो वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा आत्मा आहे , त्या संप्रदायात सध्या किर्तनकार , मृदंगाचार्य , गायनाचार्य विणेकरी तथा गावपातळीवरचे भजनी मंडळ आर्थीक संकटात सापडले असून त्यांना सरकारने मदत करावी आशी मागणी भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. पांडूरंगाचा पुजेचा मान उचलणाऱ्या मुख्यमंत्रयानी त्यांचा लेकरा कडे बघाव अस त्यांनी म्हटले.

प्रसिध्दीस काढलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले कि या संकटाचा समाजात सर्व व्यवस्थावर आर्थीक परिणाम झाला आहे. हातावर पोट असलेल्या विविध जाती धर्माच्या लोकांना तर संकटा मुळे उपाशी राहण्याची वेळ आली तरी पण महाराष्ट्र सरकारने स्वःता कवडीची आर्थिक मदत राज्यात कुणालाच दिलेली नाही हे दुर्देव असल्याचे त्यांनी म्हटले आहे . महाराष्ट्र हि संताची भुमी असून राज्यात वारकरी संप्रदाय मोठा आहे . किर्तन , भजन , हरिनाप सप्ते . भागवत कथा , रामायण , महाभारत दिंडी पताकाचा माध्यमातून फार मोठी आर्थीक उलाढाल सुरू असते . ज्यामधून वारकरी संसार जीवन जगतात . मात्र या संकटामुळे राज्यातील अध्यात्माचे दारे तथा विविध मंदिरे बंद आहेत .कीर्तनकारांना किर्तन करता येत नाही, तर त्यावर आधारित इतर सर्व सोपस्कार बंद आहेत .

मोठे ,मोठे कीर्तनकार सध्या आपल्या घरात आहेत. त्यामुळे एकूणच वारकरी संप्रदायाची आर्थिक परवड सध्या सुरू आहे .राज्य सरकारने पंढरीच्या पांडुरंग जे आराध्यदैवत आहे . साक्षी डोळ्यासमोर ठेवून, त्याच्या या लेकरासाठी आर्थिक मदत करावी .ज्या अर्थी पांडुरंगाची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. त्याअर्थी वारकरी संप्रदायाला मदत करण्याचा हक्क ,आणि अधिकार .मुख्यमंत्र्यांचा आहे .तेव्हा राज्याच्या मायबाप सरकारने या वारकरी क्षेत्रातील लोकांना तात्काळ आर्थिक मदत करावी .अशा प्रकारची मागणी प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. जर सरकारने यांना मदत केली नाही. तर निश्चित पांडुरंगाची ही लेकरं संकटात उपाशी मेल्या शिवाय राहणार नाहीत. हे मात्र नक्की असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

…अन्यथा मंत्रालयास घेराव घालणार: संभाजीराजे दहातोंडे

परत सांगतो, पार्थ लंबी रेस का घोडा: नितेश राणे

सीबीआय चौकशी करा म्हणणे अपरिपक्व कसे काय होऊ शकत? आमदार राम सातपुतेंचा शरद पवारांना टोला