लातूर : कोरोनाबाबत प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी पुन्हा एकदा अजब वक्तव्य केलं आहे. कोरोनाची तिसरी लाट ही वारकरी सांप्रदायाची माळ काढणाऱ्यांसाठीच आहे.आपल्याला कोरोना झाला नाही कारण आपण माळकरी आहोत, असे विधान किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी लातुरमध्ये आयोजीत किर्तनात केले आहे.
इंदुरीकर महाराज म्हणाले, “माळकरी असल्यामुळे आपला कोरोनापासून बचाव झाला हा आपला पुनर्जन्म आहे. वारकरी संप्रदायाची माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणार. कोरोनाला एकच औषध मन खंबीर ठेवा. दुसरं औषध नाही. गोळ्या घेऊ नका आणि काहीच घेऊ नका. उभा महाराष्ट्र मास्क वापरतो, सॅनिटायझर वापरतो, साबन वेगळे वापरतो, पण रस्त्याच्या कडेचा एखादा भिकारी पॉझिटिव्ह निघाल्याचे मला दाखवा. ते पॉझिटिव्ह आले नाहीत कारण त्यांचे मन खंबीर आहे.”
यापुर्वी इंदुरीकर महाराज यांनी कोरोना लसीबद्दल विधान केल्याने खळबळ उडाली होती. मी लस घेतली नाही आणि घेणारही असे विधान इंदुरीकर महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या विधानावरुन युटर्ण घेतला होता. त्यानंतर त्यांनी किर्तनातून कोरोना प्रतिबंधक लसीबाबत प्रबोधन केल्याचे वृत्त होते.
महत्वाच्या बातम्या:
- आता सर्व दुकानांवर मराठी पाट्याच; राज्य सरकारचा मोठा निर्णय
- आता सर्व दुकानांवर मराठी पाट्याच; राज्य सरकारचा मोठा निर्णय
- ‘…बोलताना जरा विचार करा’; धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात पुन्हा वाद
- धक्कादायक! औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही..
- रोहित शर्माचा नवा लूक पाहून तुम्हीही व्हाल हैराण; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<