fbpx

किरीट सोमय्या माफी मागण्यासाठी मातोश्रीवर जाणार

टीम महाराष्ट्र देशा : या लोकसभा निवडणुकीत गाजलेल्या किरीट सोमय्या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे. कारण वाद मिटवण्यासाठी आज किरीट सोमय्या मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड सोमय्या यांना घेऊन मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घालून देणार असून किरीट सोमय्या ठाकरे यांची माफी देखील मागणार आहेत.

मधल्या काळात भाजप आणि शिवसेने मध्ये मतभेद असल्याने दुरावा निर्माण झाला होता. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलेचं तोंडसुख घेतले होते. त्यामुळे अनेक शिवसैनिक आणि शिवसेनेचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर नाराज झाले होते. पण आता राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप एकत्र आले आहेत.परंतु ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात ही युती झालेली नाही.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून आतापर्यंत भाजपकडून किरीट सोमय्या निवडणूक लढवत असून शिवसैनिक युतीच्या काळात त्यांना मदत करत होते. मात्र आता युती झाली तरी ईशान्य मुंबई मतदार संघातल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या नावावर फुली मारली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सोमय्या वाद निर्माण झाला आहे. मात्र आता हा वाद जास्त न ताणता त्यावर पडदा टाकण्यासाठी किरीट सोमय्या यांनी प्रसाद लाड यांच्या मध्यस्थीने उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. मात्र प्रसाद लाड यांना अजूनही मातोश्रीने वेळ दिलेली नाहीये.

दरम्यान जर युती कडून ईशान्य मुंबईच्या जागेसाठी किरीट सोमय्या यांच्या नावाची घोषणा झाली तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सेनेचे आमदार सुनील राऊत यांनी केली आहे.

1 Comment

Click here to post a comment