fbpx

किरीट सोमय्यांना मदत करायची की नाही,सेनेच्या विभागप्रमुखांच्या बैठकीत होणार विचार मंथन

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना-भाजपमध्ये युती होऊन आगामी निवडणुका एकत्रितपणे लढविण्याचे निश्चित झाले आहे. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचे मनोमिलन झाले असले तरीही स्थानिक पातळीवरील संघर्ष मात्र काही थांबताना दिसत नाहीये.

युतीतील ईशान्य मुंबईच्या जागेचा पेच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या विभागप्रमुखांची बैठक बोलावली, मुंबईतल्या लोकसभेच्या जागेचा आढावा घेतला जाणार आहे, ईशान्य मुंबईतील किरीट सोमय्यांना मदत करायची की नाही यासंदर्भात चर्चा होणार आहे.

सुरुवातीला सोमय्या यांच्या नावाला शिवसैनिकांनी कडाडून विरोध केला होता. मात्र आता युतीचा निर्णय झाला असल्याने आता ईशान्य मुंबईतील शिवसेना नेते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात गुजराती मतदारांची संख्या लक्षणीय असली तरी शिवसेनेची ताकत देखील मोठी आहे. सेनेने मदत जर केली नाही तर सोमय्या यांचा पराभव देखील होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.