अर्जुन खोतकरांच्या घरावर ईडीचा छापा; किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

अर्जुन खोतकरांच्या घरावर ईडीचा छापा; किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

Kirit Somaiyya And Arjun Khotkar

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी ही छापेमारी करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या यांच्या जालन्यामधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ED) शुक्रवारी सकाळी छापा टाकला आहे.

जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांच्या घरी आज सकाळी साडे 8 वाजता ईडीने छापा टाकला आहे. अर्जुन खोतकर हे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळेच जालन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतही ईडीकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. सकाळी साडे 8 वाजल्यापासून ईडीचे पथक अर्जुन खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यामध्ये आहेत. त्यावरुन आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना नेता अर्जुन खोतकर जालना सहकारी साखर कारखाना घोटाळा केल्याने, ईडीने जालना येथे छापे टाकले आहेत. आम्ही स्वागत करीत आहोत. कारवाई झालीच पाहिजे. 10 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन त्यांनी हडप केली आहे. शेकडो करोडोंचा घोटाळा त्यांच्याबरोबर त्यांचे बिझनेस पार्टनर आणि मुंबईचे संयुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची पत्नीदेखील सहभागी आहेत, चौकशी तर झालीच पाहिजे, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान, 12 जणांचं पथक या ठिकाणी तपासणी करत आहे. आतमधून दरवाजे बंद केले असून कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. छापा पडला तेव्हा अर्जुन खोतकर हे घरीच असल्याची अशी माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या