मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो-करोडो रुपयांची देणगी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावे माध्यमांशी बोलताना केला आहे. ईडीमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी सोमय्यांवर कारवाई करावी असं आव्हानही त्यांनी दिले.
भ्रष्टाचाराची सुरूवात महाराष्ट्रात या लोकांनी केली. मी गेल्या दोन दिवसात त्यांच्या युवक प्रतिष्ठान संस्थेच्या खात्यात जे पैसे येत आहेत, त्यामध्ये डीदशे पेक्षा अधिक कंपन्या आहेत, बिल्डर्स आहेत. अनेक संशयास्पद लोक आहेत, ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची चौकशी सुरू आहे, छापे टाकले जात आहेत. या सर्वांनी किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो-करोडो रुपयांची देणगी दिली आहे. १५० पेक्षा अधिक कंपन्यांशी किरीट सोमय्यांचा संशयास्पद व्यवहार आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –