गंभीर आरोप करत किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

kirit somayya

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्रात कोर्लई (अलिबाग) येथील 19 बंगल्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली नाही. याविरोधात मी निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली. ठाकरे यांनी 21/03/2014 रोजी अन्वय नाईक कडून जमीन व बंगले खरेदी केले. ते 12/11/2020 रोजी ठाकरे यांच्या नावावर करण्यात आले, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

उद्धव ठाकरेंचे 19 बंगले, प्रताप सरनाईकांची 78 एकर जमीन ED चा ताब्यात, संजय राऊत प्रवीण राऊतांचे पार्टनर महाकाली मंदिर/गुंफाची जमीन बिल्डरला, बीएमसीनी दहिसरचा ₹2.55 करोडचा जागेचे बिल्डरला ₹349 करोड दिले. 5000 खाटांचा ₹12,000 कोटीचा कोवीड हॉस्पिटल घोटाळा आणखी किती पुरावे हवेत, असा सवालही किरीट सोमय्यांनी विचारला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांनी जाणूनबुजून ही संपत्ती लपवल्याचा दावा केला आहे. आम्ही ही तक्रार निवडणूक आयोगाचे महाराष्ट्र प्रतिनिधी बलदेव सिंह यांच्याकडे केली असून, ही तक्रार निवडणूक आयोगाच्या दिल्ली येथील मुख्यालयात पाठवण्याचं बलदेव सिंह यांनी आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या