मुंबई:- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, या तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत हे आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.
धनंजय मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करुन, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाला याची सर्व माहिती आहे, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मुंडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर केलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोचीच माहिती दिली होती. दुसऱ्या महिलेची माहिती दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत.
याप्रकरणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मी महाराष्ट्रातील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्नी, मुले आणि मालमत्तांबद्दल तथ्ये लपविल्याप्रकरणी आणि महत्त्वाची माहिती जाहीर न केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय, असंही किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.
I have submitted complaint against Maharashtra Minister #DhananjayMunde to Election Commision of India for Non Disclosure, Concealment of Facts about Wives, Children & Properties @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @BJP4India pic.twitter.com/RlVSElNTty
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 13, 2021
महत्वाच्या बातम्या
- हे पण आम्हीच केले…औरंगाबादमध्ये रंगली सेना- काँगेसमध्ये श्रेयवादाची लढाई
- कुठल्याही परिस्थितीत औरंगाबादचे संभाजीनगर होणारच; शिवसेनेच्या एकमेव मुस्लिम आमदाराचा एल्गार
- ‘गेंड्याच्या कातडीचे मंत्री व महाविकास आघाडीचे सरकार मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटत नाही’
- ज्यांचा कोरोना लसीवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात निघून जावे; भाजप नेत्याचा अजब सल्ला
- जाणून घ्या ग्रामपंचायत निवडणुकीला एवढे महत्व का?