fbpx

किरीट सोमय्यांचा पत्ता कट? ‘मातोश्री’चा सोमय्यांच्या भेटीला नकार

किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेत सोमय्यांविषयी नाराजी आहे. त्यातच आता किरीट सोमय्या यांना ‘मातोश्री’वरुनही भेट नाकारली आहे.

किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर अनेकदा अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. शिवसैनिक सोमय्या यांनी केलेली टीका विसरलेले नाहीत. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघात किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे,” असं शिवसेना खासदार राहुल शेवाळे म्हणाले होते. त्यामुळे किरीट सोमय्यांकडून उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी किरीट सोमय्यांनी वेळ मागितली होती. परंतु ‘मातोश्री’वरुनही भेटीसाठी नकार मिळाला.