किरीट सोमय्या आज हसन मुश्रीफांवर १५०० कोटींच्या घोटाळ्याची तक्रार दाखल करणार

किरीट सोमय्या

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या आज दुपारी १ वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांवर १५०० कोटींच्या केलेल्या घोटाळ्याची तक्रार पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करणार आहेत. असे ट्विट किरीट सोमय्यांनी केले आहे.

किरीट सोमय्या आता पुन्हा आक्रमक झाले आहेत. सोमय्यांनी आतापर्यंत आघाडीच्या एकूण ११ नेत्यांवर भष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. आता त्यांनी पुन्हा मुश्रीफांवर ग्रामपंचायत कंत्राटीत १५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला असून आज पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंग, बेनामी संपत्ती गोळा करणे तसेच इतर अनेक गैरव्यवहार करण्याचे गंभीर आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी प्रथमदर्शी १२७ कोटींचा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे तपास झाल्यानंतर हा आकडा वाढणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

यापूर्वी किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या घोटाळ्याबाबत पोलिसांकडे पुरावे सुपूर्द केले होते. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयाशी मिळून १५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला. ही कला पण एक वेगळीच कला आहे. मुश्रीफ यांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याचे टेंडर हे स्वतःच स्वतःच्या जावयाच्या कंपनीला दिले, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या