मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून काल(२६ जाने.)तब्बल ७५ वर्षानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौकात साजिद युसूफ शाह(Saajid Yusuf Shah) आणि साहिल बशिर(Sahil Bashir) या दोन कार्यकर्त्यांनी तिरंगा फडकावला.कलम ३७० हटवल्यानंतर आणि दहशतवाद्यांवर केल्या जाणाऱ्या कारवायांमुळे श्रीनगर येथील स्थानिक युवक समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘ह्या प्रजासत्ताक दिनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकला. डॉ. मुरली मनोहर जोशी(Dr. Murli Manohar Joshi) आणि माननीय नरेंद्र मोदीजी(PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली एकता यात्रेच्या वेळी १९९२ मध्ये शेवटचे समारंभपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले होते. तसेच त्या कार्यक्रमातील ६३ सहभागींपैकी मी एक होतो’, असे सोमय्या यांनी सांगितले आहे.
ह्या प्रजासत्ताक दिनी श्रीनगरचा लाल चौकात तिरंगा फडकला
डॉ मुरली मनोहर जोशी आणि माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एकता यात्रेच्या वेळी 1992 मध्ये शेवटचे समारंभपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले होते
त्या कार्यक्रमातील ६३ सहभागींपैकी मी एक होतो@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/SZDoyp2dzM
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 27, 2022
दरम्यान, तिरंगा फडकावल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना साजिद युसूफ शाह म्हणाले की, ‘हे सर्व श्रेय त्या लोकांना जाते ज्यांनी कलम ३७० रद्द केले. त्यामुळेच आम्हाला आज लाल चौकात ध्वज फडकवण्याची संधी मिळाली. असं वाटतंय इतिहासात पहिल्यांदाच आपण भारतात आहोत’, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
‘या’ बडया सेलिब्रिटींनी रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या ‘पुष्पा’ला नाकारले
आदित्य ठाकरेंनी शिवसेना नेत्यांना दुरूनच जोडले हात; ताफ्यातही मिळाली नाही एंट्री…!
आता मिशन वर्ल्डकप..! क्रिकेटर स्मृती मंधानानं डोळ्यासमोर ठेवलं एकच लक्ष्य; वाचा सविस्तर
Google CEO सुंदर पिचाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल; वाचा नेमकं काय आहे प्रकरण
टिपूच्या बगलबच्चाना जनता योग्य धडा शिकवेल… हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळू देणार नाही- आ.अतुल भातखळकर