किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार; मुश्रीफांचा आक्रमक पवित्रा

hasan mushrif vs kirit somayya

मुंबई : शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री माझ्या रडारवर आहेत, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आज म्हणजेच सोमवारी यातील एका मंत्र्याचा भ्रष्टाचार माध्यमांसमोर उघडे करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितलं होतं. यानंतर सबंध महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये तर्क-वितर्क लावले जात होते.

अखेर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन तो राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री कोण हे जाहीर केलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यासह त्यांचे पुत्र नावीद मुश्रीफ, हसन मुश्रीफ यांच्या पत्नी या देखील या भ्रष्टाचारात सामील असल्याचं म्हटलं. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून तब्बल १०० कोटींहून अधिकच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

यावर आता हसन मुश्रीफ यांनी प्रतक्रिया दिली आहे. मी सोमय्या यांच्यावर फौजदारी 100 कोटींचा दावा दाखल करणार आहे. असे त्यांनी सांगितले आहे. तसेच किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला.

किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :