भाजपचा लढवय्या ढाण्या वाघही अडकला कोरोनाच्या विळख्यात

Kirit Somyya

मुंबई – कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतोरी प्रयत्न करत आहे. मात्र, देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती, तर अनेक दिग्गजांनाही या रोगाचा सामना करावा लागला आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता लोकप्रतिनिधीनांही करोनानं गाठलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीनाही करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. किरीट सोमय्या यांनीच ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

मी व माझी पत्नी यांना करोनाची लागण झाली असून आमच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. करोना संकटाच्या काळात त्यांनी अनेक भागांत जाऊन प्रत्यक्ष मदत केली होती. तर, वेळोवेळी राज्यातील करोना स्थितीवरही त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता.

दरम्यान, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णलयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. काल त्यांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्य्यावर कोरोनाचेही उपचार सुरुच होते.

दरम्यान, प्रसिद्ध हिंदी आणि उर्दू शायर व गीतकार राहत इंदौरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत:च याबद्दल सोशल मीडियातून माहिती दिली आहे. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा-कौर यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला तात्काळ हलविण्यात आले आहे. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र, तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

शाळा व महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क कमी करण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी