मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून भाजपवर सतत हल्लाबोल करत असताना पाहायला मिळत आहेत. सध्या राजकारणात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप आणि मनसे, असे चित्र पाहायला मिळत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचं अल्टिमेटम दिल्यामुळे शिवसेनेसमोर मोठं आव्हान निर्माण झाले आहे.
तसेच दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील नेते, मंत्र्यांसह थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप करत आहेत. अशावेळी महाविकास आघाडीकडून शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. ‘सोमय्यांना जोडेच मारले पाहिजेत’ अशा शब्दात राऊतांनी सोमय्यांवर थेट निशाणा साधला.
सोमय्यांबाबत विचारलं असता राऊत म्हणाले, “जो माणूस महाराष्ट्राच्या विरुद्ध दिल्लीत जाऊन कारस्थानं करतो, त्याला जोड्यानंच मारलं पाहिजे”. ही परंपराच आहे महाराष्ट्राची. एन्ड आय रिपीट.. आणि मी शब्द मागे घेतले का? मी सॉरी बोललोय का? नाही. मी 35 वर्ष बाळासाहेबांसोबत काम केलंय. 30 वर्ष संपादक म्हणून काम केलंय. तुम्ही जर कोणाच्या तरी सुपाऱ्या घेत असाल आणि बदनाम करत असाल, आणि महाराष्ट्राबद्दल प्रेझेंटेशन देत असाल तर जोड्यानेच मारले पाहिजे,” असा हल्लाबोलच राऊतांनी चढवला.
महत्वाच्या बातम्या –