मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणावरुन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला असून परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज (२६ मार्च) दापोलीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, दापोलीतील शिवसेना विरुद्ध भाजप आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून यामुळेच आता सोमय्या यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्यांनी प्रतिकात्मक हातोडा दाखवत ठाकरे सरकारला इशारा दिला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक असून जनता असाच हातोडा घेऊन यांना बाहेर घालवणार आहे. हा हातोडा साडेबारा कोटी जनतेचा आहे, असे सोमय्या म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन हे अनधिकृत रिसॉर्ट आहे असे सांगावे, असे आव्हानही सोमय्यांनी केले.
पुढे प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करत सोमय्या म्हणाले की,‘महाराष्ट्राचे कॅबिनेट हे प्रताप सरनाईक यांचे अनधिकृत बांधकाम वाचण्यात मग्न आहे.’ तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त एकबाल चहल यांच्यावर टीकास्त्राचा प्रहार करत ते म्हणाले की,‘ कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी आयुक्त सांगत आहेत ही मेडिकल इमर्जन्सी होती, घोटाळेबाजांना पाठीशी घालणार असेल तर कारवाई त्यांच्यावरही होणार’, असा इशाराही त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
- “जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो ईश्वर”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला
- …यामुळे न्यायव्यवस्था आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर विश्वास ठेवायचा तरी कसा?- संजय राऊत
- “…याबाबत सत्य सांगणारा ‘पेन ड्राईव्ह’ विरोधी पक्षाच्या घरात बाळंत का झाला नाही?”, राऊतांचा हल्लाबोल
- “…हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?”, केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्यांनी दाखवला प्रतिकात्मक हातोडा; म्हणाले, “…यांना बाहेर घालवणार”