एलफिन्स्टनच्या दुर्घटनेत २३ मृत्यू, तर किरीट सोमय्या गरबा खेळण्यात दंग ?

मुंबई : एलफिन्स्टन स्टेशनच्या पुलावर चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला. या घटनेला २४ तास उलटायच्या आतच भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे गरबा खेळण्यात मग्न होते का, असा प्रशन आता सोशल मिडीयावर उपस्थित केला जात आहे. याच कारण म्हणजे नुकताच सोशल मिडीयावर किरीट सोमय्या यांचा एक गरबा खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
किरीट सोमय्या यांचा हा गरबा खेळतानाचा व्हिडीओ एलफिन्स्टन दुर्घटनेच्या आधीचा आहे की नंतरचा, याबाबत मात्र अद्याप खातरजमा झालेली नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विटरवरुन किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियातही किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

तर खासदार किरीट सोमय्या यांची या व्हिडीओबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.