‘ठाकरे’ सरकार नाईट लाईफ चालू करून दारु-पब संस्कृतीला प्राधान्य देतय’

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र सरकारमधील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरु करत आहेत. ही नाईट लाईफ प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. मात्र या नाईट लाईफवर मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील ठाकरे सरकार आणि आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या नाईट लाईफ निर्णयावर शाब्दिक निशाणा साधला आहे. ते पनवेल येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले, ‘ठाकरे सरकार हे नाईट लाईफ चालू करून फक्त दारू आणि पब संस्कृतीला चालना देत आहेत,’ अशी टीका त्यांनी यावेळी सरकारवर केली.

Loading...

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘नाईट लाईफचा कोणताही फायदा सर्वसामान्यांना होणार नाही. उच्चभ्रू लोकांसाठी ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय आहे. यावरून ठाकरे सरकार हे कोणत्या निर्णयांना प्राध्यान्य देत आहे हे स्पष्ट झालं आहे, ‘ असे किरीट सोमय्या यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, ,ठाकरे सरकार हे नाईट लाईफ सुरु करून फक्त दारू आणि पब संस्कृतीला चालना देत आहेत. ही नाईट लाईफ नाही, तर नाईट क्लब आहे,’ असा घणाघाती आरोप सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'