‘बाबरी माशिदी’साठी ट्रस्ट तयार करण्याची मागणी करणाऱ्या पवारांवर भाजपने डागली तोफ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवण्यात आली, मग मशिदीसाठी ट्रस्टची स्थापना का करण्यात आली नाही? अशी विचारणा शरद पवार यांनी केली आहे.तसेच सरकारने अयोध्येत मशीद बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.

काल पक्षाच्या राज्य संमेलनात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लखनौच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी राम मंदिरासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टबाबत आपले मत मांडले.जर केंद्र सरकार राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना करू शकते. तर अजून एका ट्रस्टची स्थापना करून मशीदीसाठी निधी का देऊ शकत नाही,’ असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

Loading...

उत्तर प्रदेशात विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणून भाजपची कोंडी करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करत आहेत. बुधवारी लखनऊ इथं झालेल्या कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी देशाला धर्माच्या आधारे विभागलं जात असल्याचा आरोप केंद्रातील आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर केला.

याच मुद्द्यावरून सोशल मिडीयावर शरद पवारांना ट्रोल केलं जात आहे. पवारांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यायांनी निशाणा साधला आहे. शरद पवारांनी राम जन्मभूमी मंदिर ची बाबरी मशिद शी तुलना करणे, ह्याचा खेद वाटतो. सर्वोच्च न्यायलयाने निर्देश दिले आहेत.राम जन्मभूमीवर श्रीरामांचा भव्य मंदिर बनावं, अशी हिंदुस्थानच्या सव्वाशे कोटी लोकांची भावना आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश