‘२ तारखेपासून शिवसेनेचे मंत्री अनिल परबांचे अवैध कार्यालय जमीनदोस्त होणार’, किरीट सोमय्यांचा दावा

‘२ तारखेपासून शिवसेनेचे मंत्री अनिल परबांचे अवैध कार्यालय जमीनदोस्त होणार’, किरीट सोमय्यांचा दावा

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी दापोली मुरुड समुद्रकिनारी असलेला बंगला पाडला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बंगल्याबाबत पर्यावरण खात्याकडे तक्रार केली होती. मुरुड दापोलीच्या समुद्र किनारी मिलिंद नार्वेकर यांचा अलिशान बंगला होता. यानंतर आता शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या कार्यालयावरही सोमय्यांची वक्रदृष्टी पडली आहे. वांद्रे येथील परब यांचे कार्यालय अनधिकृत असून त्यासंदर्भात लोकायुक्तांनीच बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्याचं सोमय्या म्हणालेत.

‘उद्धव ठाकरेंचा उजवा हात असणाऱ्या मिलिंद नार्वेकरांना बंगला तोडावा लागला आणि आता डावा हात असणाऱ्या परबांच्या कार्यालयावर कारवाई होणार आहे’, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘लोकायुक्तांनी परिवहनमंत्री अनिल परब यांचं कार्यालय तोडण्याचे आदेश दिले आहेत. लोकायुक्तांसमोर न्यायालयामध्ये ठाकरे सरकारनेच परब याच्या कार्यालयाचं बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती दिली आहे. गांधी जयंतीच्या दिवशी परब यांच्या कार्यालयावर कारवाई सुरू केली जाणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितले.

तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी सोमवारी आणखी दोन मंत्री रडारवर असल्यांचं सांगितलं आहे. शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री माझ्या रडारवर आहेत, दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच येत्या सोमवारी या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार माध्यमांसमोर उघडे करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. मात्र, त्यांनी या दोन्ही नेत्यांची नवे उघड केलेली नाही. त्यामुळे हे दोन नेते कोण? यावर तर्कवितर्क लावले जात आहेत.

अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्युएशनचे कागद लोकांसमोर का ठेवत नाहीत? ६५ कोटी रुपयांत कारखाना घेतला आणि ७०० कोटी रुपयांचं कर्ज घेतले आहे. वैभव शिदे असं एका व्हॅल्युअरचं नाव आहे. शरद पवार यांना यासाठीच सहकार चळवळ हवी आहे का? असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या