fbpx

शिवसेना आणि उद्धव ठाकरे आता तरी जमीनवर येणार ? – किरीट सोमय्या

किरीट सोमैया

टीम महाराष्ट्र देशा: किरीट सोमय्या हे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता गुजरात आणि हिमाचलच्या निकालानंतर सुद्धा सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. “गुजरात आणि हिमाचल मधे भाजपा पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धव जी ठाकरे आणि शिवसेना ला आत्ता तरी जाग येणार , जमिनी वर येणार, ही देवाला प्रार्थना” अस वक्तव्य किरीट सोमय्यांनी केल आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेस किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यात चांगलाच सामना रंगला होता या वादात किरीट सोमय्यांना सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण देखील झाली होती. त्यामुळे सोमाय्यांच्या या वक्तव्यावर सेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासारख आहे.