पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या शूर पुत्राला वीरमरण

किरण पोपटराव थोरात

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचा अजून एक शूर पुत्र देशासाठी धारातीर्थी पडला आहे. औरंगाबादचा जवान किरण पोपटराव थोरात यांना पाकिस्तानसोबतच्या चकमकीत वीरमरण आलं.काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात 31 वर्षीय किरण थोरात शहीद झाले.

काल कृष्णाघाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यात त्यांना वीरमरण आलं. किरण यांचं वय 31 वर्षे होतं. किरण यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि त्यांची दोन वर्षाची मुलगी आहे. काल दुपारी कृष्ण घाटी आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यामध्ये किरण जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

किरणच्या वीरमरणामुळे वैजापूर तालुक्यासह मराठवाड्यावर शोककळा पसरली आहे.Loading…
Loading...