मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. पण ज्यांना मी नको आहे, त्यांनी तसे येऊन सांगावे किंवा फोनवर बोलावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. आता या भाषणावर अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमध्ये विलास पाटील (Vilas Patil) ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते कायम राज्यातील राजकारणावर त्यांचे मत मांडत असतात. यावेळी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर अभिनेते किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अतिशय आत्मविश्वासानं, मनापासून बोलले ! एवढं घडूनही ‘Cool’ आहेत हे लै भारी. सत्तेसाठी तडफडणार्या, आक्रस्ताळेपणा करणार्या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला. सत्ता बळकावणार्याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणार्याला इतिहास लक्षात ठेवतो”, असे किरण माने यांनी लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या :