मुंबई: सध्या ‘मुलगी झाली हो’ या स्टार प्रवाहवरील मालिका आणि अभिनेता किरण माने चर्चेत असलेले प्रकरण आहे. दोन दिवसांपूर्वी राजकीय भूमिका मांडल्यामुळे किरण माने (Actor Kiran Mane)यांना मालिकेतून काढण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. माने यांच्या लिखाणशैलीमुळे यापूर्वीही अनेक चर्चा झाल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी केलेली एक पोस्ट चांगलीच गाजत आहे. स्टार प्रवाहच्या भूमिकेवर राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही टीका केली आहे. आता असे असतानाच किरण माने यांनी पुन्हा एक नवीन फेसबुक पोस्ट केली आहे.
किरण मानेंची नवी फेस्बोक पोस्ट-
आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्राॅडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू..आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत…अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे… करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हायेत. प्राॅडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे… चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते ‘सत्य’ सांगतीलच !पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा. मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी.तुका म्हणे रणी…नये पाहो परतोनी! अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.
आता या पोस्टमुळेही पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर राष्ट्रवादीचे रोहित पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनीही स्टार प्रवाह वाहिनीला त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून टीका केली होती. तसेच सोशल मिडीयावरही #stand for kiran mane ही मोहीम चालवली गेली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नुसतं फुटबॉलचं स्टेडियम उभारून चालणार नाही तर…’; उद्धव ठाकरेंचे खेळाडूंना आवाहन
- मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे निवडणूक आयोगाला पत्र; केली ‘ही’ मागणी
- जयंत पाटलांनी थेट एलॉन मस्क यांनाच दिले आमंत्रण
- “जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा”, नवाब मलिकांचा रवी किशन यांना टोला
- ‘तृणमूल कॉंग्रेस तर सत्तेवर आली आहे, आता फक्त…’; संजय राऊतांचा टोला