fbpx

प्रेक्षकही म्हणतायत ‘देअर यू आर’ भैयासाहेब ; वाचा किरण गायकवाड ते भैय्यासाहेब पर्यन्तचा प्रवास

झी मराठी वरील  ‘लागिरं झालं जी’ मालिकेबरोबरच त्यातील पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आज्या, शितली, जयडी, राहुल्याप्रमाणेच भैयासाहेब ही व्यक्तिरेखा लोकांनी डोक्यावर घेतलीय. प्रेक्षकही म्हणतायत ‘देअर यू आर’ भैयासाहेब.

नायकाप्रमाणेच खलनायकाची भूमिकाही महत्वाची असते. अशाच काही खलनायकांच्या भूमिका लोकांच्या मनात घर करून जातात. असच किरण गायकवाड उर्फ ‘भैयासाहेब’ याने आपल्या भूमिकेने लोकांचे लक्ष वेधून घेतले. तर या भैय्यासाहेबांचा प्रवास कसा झाला आणि ते लागीर झालं जी पर्यंत कसे पोहचले?

किरण गायकवाड हा मुळचा पुण्याचा बालपणही पुण्याचं. प्राथमिक शिक्षणही पुण्यात झालं. पुण्याचा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून त्यांनी एम कॉम च शिक्षण पूर्ण केलं. त्याला कधी अभिनयाची आवड होती अशातला काही भाग नाही किंवा पुढे जाऊन तो अभिनय क्षेत्रात जाईल असाही त्याला कधी वाटलं नव्हतं.

अभिनयाकडे वळणं…

इयत्ता ८ वीत असताना एका छोट्याशा नाटुकली मुले त्याला अभिनयाची गोडी लागली पण अभिनय क्षेत्राकडे त्याने करिअर म्हणून कधीच पहिले नव्हते. पण शाळेतील बनसोडे सरांनी त्याची पाठ थोपटली, ‘तू खूप चं नाटक करतोस त्यातच काहीतरी पुढे जाऊन कर’ त्यांच्या या वाक्यामुळे एकदारीतच किरणचा  अभिनय क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. पण त्यावेळी आर्थिक परीस्थित नसल्याने त्याने महविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्याने महिंद्र कंपनीत कामाला सुरुवात केली.

किरणाच्या आयुष्याला कलाटणी लागली ती त्याचा आजाराने २०११ साली किरण खूप आजारी पडला आणि या आजारपणामुळे त्याला जॉबही सोडवा लागला. त्यावेळी आता काय करायचेह असा प्रश्न त्याचा समोर उभा राहील. पण त्याला बनसोडे सरांची कौतुकाची थाप आणि अभिनयाची आवड या दोन्ही गोष्टी आठवल्या. आणि त्याने अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

किरणने करिअर म्हणून अभिनय क्षेत्राचा विचार करायला सुरुवात केली. घरी अभिनयाची पार्श्वभूमी नव्हती.  किरणचा मोठा भाऊ पत्रकार. त्याने किरणला या क्षेत्रातील संघर्षाची कल्पना दिली.  त्यावेळी किरण डीजे म्हणून काम करत होता. त्यातूनच त्याला संगीताची आवड निर्माण झाली. मग तो म्युझिक शो आणि कंपोझिंग करून पैसे कमवू लागला.

 

अभिनयच्या क्षेत्रात संघर्ष हा आहेच. तो किरणलाही करावा लागला. अभिनय क्षेत्राकडे वळल्यानंतर प्रथम त्याला त्याचा भाषेवर आणि उच्चारांवर मेहनत घायवी लागली. तसेच अभिनयामुळे त्याला वाचनाची आवड लागली. त्यानंतर पथनाट्य, एकांकिका ते व्यावसायिक नाटक आणि मलिका अशा वेगवेगळ्या अभ्ण्याच्या छटा त्याला अनुभवायला मिळाल्या. वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन देऊन अनेक ठिकाणी काम करून त्याला खूप काही शिकायला मिळालं

‘लागीर झालं जी…’

एका प्रोजेक्टमध्ये कलादिग्दर्शक म्हणून काम करत असताना किरणची शिवानी बावकर शी त्याची मैत्री झाली. आणि एकदा शिवानीने त्याचा कडून त्याचे फोटो मागून घेतले. तेव्हा शिवानी ‘लागिरं झालं जी’ मध्ये काम करत होती. तिने ते फोटो भैय्यासाहेब या भूमुकेसाठी तेजपालला दाखवले. पण त्यावेळी तेजपालला किरण या भूमिकेसाठी योग्य न वाटल्याने त्याने नकार दिला.

शिवानी प्रमाणे निखील चव्हाण (अज्या) हा देखी किरणचा मित्र एक दिवस किरण निखील सोबत शूट ला गेला तेव्हा तिथे तेजपालही होता तेव्हा त्याने किरणला ओळखलं शिवानीने फोटो दाखवल्याच सांगितलं आणि तिथे त्यांची नव्याने ओळख झाली. एके दिवशी तेजपालन किरणला एक छोटी ऑडिशन क्लिप बनवून पाठवायला सांगितली आणि ती क्लिप पाहून तेजपालने किरणला ‘लागिरं झालं जी’ मलिकेतील भैय्यासाहेब ही भूमिका तू करतोय अस सांगितलं. हि मालिका झी मराठीची आहे कळल्यानंतर किरण अधिकच खुश झाला. या आधी किरणने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘फुंतरु’ यासरख्या चित्रपटातून भूमिका केल्या होत्या पण लागिरं झालं जी’ मलिकेतील भैय्यासाहेबाने त्याच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी दिली.

भैय्यासाहेब हा ‘लागिरं झालं जी’ चा खलनायक. हर्षवर्धन हे त्याचं नाव पण लोक त्याला प्रेमाने ‘भैय्यासाहेब’ म्हणतात. हे तेजपालने किरणला नीट समजावून सांगितले. भैय्यासाहेब खलनायक असला तरी या पात्राच्या स्वभावाला वेगवेगळ्या छटा आहेत. तो थोडा मुडी आहे, थोडा प्रेमळ आहे. राजकारणी असला तरी समाजकार्य करण्याकडे त्याचा कल आहे. मालिकेच्या प्रत्येक पात्राबरोबर त्याचं एक वेगळ नात आहे, प्रत्येक बरोबर वागण्याची त्याची पद्धत वेगळी आहे. त्याला राग आला कि तो त्याचा सवंगड्यांना मारतो त्यांना त्रास देतो, तेच दुसऱ्या क्षणाला त्यांना प्रेमानं जवळही करतो. स्वभाव थोडा विक्षिप्त असला तरी प्रेमळही आहे.

एक माणूस आणि दहा स्वभाव अशी व्यक्तिरेखा साकारताना त्याच्या प्रत्येक बाजूवर मेहनत घ्यावी लागते. किरण आणि भैय्यासाहेब हि दोन विरुध्द टोकं आहेत. भैय्यासाहेबाना खूप राग येतो मात्र किरण मुळात रंगीत नाही. त्याला राग आला तरी तो समोरच्याला प्रेमानं समजावून सांगतो. ‘भैय्यासाहेब हे गावातल मोठ प्रस्थ असल्यानं त्याचा रुबाब किरणला स्वतःमध्ये भिनवावा लागला. ही भूमिका साकारताना कुठेही अतिशयोक्ती होऊ नये ह्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते’ असे किरण सांगतो.

‘भैय्यासाहेब’ मुळे किरणला लोकांचं प्रेम मिळू लागलंय त्यामुळे ‘भैय्यासाहेब’ साकारताना किरणला स्वतची प्रतिमा जपावी लागते. हे सगळ करत असताना तो त्याचा आईला त्याच्या मित्रांना तसेच डीजे लाईफला खूप मिस करतो.

तसेच या वर्षीच्या झी मराठी २०१८ विशेष खलनायक भूमिकेचा पुरस्कार ही किरणने पटकवला आहे. तसेच त्याला या एका भूमिकेत न अडकता अजून अनेक भूमिका करायच्या आहेत.