किंग्ज ११ पंजाबच्या त्रिशतकवीर खेळाडूने केली कोरोनावर मात

Kings XI Punjab

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यातच क्रिकेटर करुण नायर हा देखील या विषाणूच्या विळख्यात अडकला होता.आता करुण नायरने कोरोनावर मात केली आहे. यामुळे तो किंग्स इलेव्हन पंजाबबरोबर पुढच्या आठवड्यात युएईला जाऊ शकेल. पण त्याआधी संघाच्या प्रोटोकॉलनुसार त्याला आणखी तीन कोरोना टेस्ट करून घ्याव्या लागतील. त्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच तो संघात सामील होईल.

करुण नायर हा दोन आठवडय़ांपेक्षा जास्त कालावधीसाठी विलगीकरणात होता. त्यानंतर झालेल्या चाचणीमध्ये त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. कोरोना चाचणी निगेटिव्ह येणारे खेळाडू आणि सहकारी वर्गातील सदस्यच 20 ऑगस्टनंतर यूएईला उड्डाण करू शकतील.

करुण नायर बंगळुरूहून चार्टर विमानात चढणार आहे. तेथे एका छोटय़ा गट या चार्टर विमानाने प्रवास करत दिल्लीतील खेळाडू आणि कर्मचारी यांना विमानाने मुंबईला घेऊन येईल.२०१८ पासून नायरने पंजाबसाठी १४ सामने खेळले आहेत. २०१८ च्या आयपीएलमध्ये त्याने ३०१ धावा केल्या होत्या तर गेल्या आयपीएलमध्ये त्याने पंजाबसाठी केवळ एक सामना खेळला. विरेंद्र सेहवागनंतर करुण नायर हा एकमेव खेळाडू आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकले आहे.

अत्यावश्यक कामाखेरीज म.न.पा. मध्ये येण्याचे टाळा, तुकाराम मुंढे यांचे आवाहन

भाजपच्या ढाण्या वाघाने कोरोनाला दिला धोबीपछाड

देवेंद्र फडणवीसांवर भाजप सोपविणार लवकरच मोठी जबाबदारी