किंग्ज इलेव्हन पंजाब : प्लेऑफच्या आशा कायम राखण्यासाठी विजय आवश्यक

kings 11 panjab

दुबई : यंदाच्या मोसमात ख्रिस गेल किंग्ज इलेव्हन पंजाब संघात आहे. मात्र ७ सामने होऊन देखील ख्रिस गेलला खेळवण्यात आलेलं नाही.पंजाबने आतापर्यंत ७ पैकी ६ सामने गमावले असून चाहते ख्रिस गेलच्या आगमनाची वाट पाहत आहेत.

ख्रिस गेलला संघात का संधी मिळत नाही आहे, याचे कारण समोर आले होते. गेलला अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले होते. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी गेलला फूड पॉयझन झाल्याचे सांगितले होते.

आयपीएलमधील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल आता तंदुरुस्त झाला आहे. पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी ही माहिती दिली असून, गेल लवकरच संघातून खेळताना दिसेल,रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून गेल पंजाबकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे

पंजाबला सातपैकी सहा सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आणि प्लेऑफच्या आशा कायम राखण्यासाठी त्यांना कुठल्याही स्थितीत विजय मिळवावा लागेल. छोटे मैदान ख्रिस गेलसारख्या ‘सिक्सर किंग’साठी फायदेशीर ठरू शकते.

महत्वाच्या बातम्या-