fbpx

हा भारतीय खेळाडू असणार किंग्ज इलेव्हन पंजाबचा नवा कर्णधार

kingsxi--flag

टीम महाराष्ट्र देशा- आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या नेतृत्वाची धुरा आर. अश्विनच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ट्वीटर अकाऊंट वरून याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

आयपीएलमध्ये आधीच्या पर्वांमध्ये अश्विनने चेन्नई सुपर किंग संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएल जिंकणाऱ्या संघाचे अश्विनने दोनदा प्रतिनिधित्व केले आहे.याआधी तब्बल ७ कोटी ६० लाख रुपयांची बोली लावत पंजाब ने अश्विन ला खरेदी केले होते.. अश्विनसह पंजाबकडून लोकेश राहुल, अँड्रयू टाय, मार्कस स्टॉईनिस, करुण नायर, अक्षर पटेल, ख्रिस गील, अॅरोन फिंच आणि डेव्हिड मिलर हे प्रमुख खेळाडू खेळताना दिसतील.

जीवनामध्ये नेहमी पुढे जाण्यास आणि प्रत्येक समस्यांवर विजय मिळवण्यास मी नेहमीच जास्त महत्त्व देतो असे अश्विन म्हणाला आहे. पंजाबचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ठ आणि सर्वांना गर्व वाटेल अशी कामगिरी करेल असा विश्वास अश्विनने व्यक्त केला आहे. तसेच कर्णधारपदाचा कोणताही दबाव नसेल असेही स्पष्ट केले आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब संघ – आर. अश्विन ,अक्षर पटेल,डेव्हिड मिलर, मार्कस स्टॉईनिस ,युवराज सिंह,मयांक अग्रवाल ,करुण नायर ,लोकेश राहुल ,अॅरोन फिंच,मोहित शर्मा,अंकित राजपूत,मुजीब जार्दन ,मंजूर डार, प्रदीप साहू , मनोज तिवारी ,अँड्रयू टाय ,आकाशदीप नाथ,ख्रिस गील,बरिंदर सरन,बेन द्वारशियस,मयंक डागर