नगरचे किंगमेकर कर्डिलेच ? गांधींचे मुलगा-सून पराभूत तर कर्डिलेंच्या दोन्ही मुली विजयी !

टीम महाराष्ट्र देशा : नगरच्या राजकारणात नेहमीच महत्वाच्या भूमिकेत असणारे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दोन्ही मुली निवडून आल्या आहेत. कर्डिलेंच्या तिसऱ्या कन्या ज्योती गाडे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला, तर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप यांनीही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत दणदणीत विजय मिळवला.

तर नगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी आणि सून दीप्ती गांधी यांना पराभव पत्करावा लागला आहे. भाजपने पालिका निवडणुकीत मोठं बळ लावलं होतं. पण म्हणावं तसं यश आलं नाही.

Loading...

विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या अहमदनगर महापालिकेत अखेर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी 18, तिसऱ्या क्रमांकावर भाजप 14 आणि काँग्रेस 5 चौथ्या क्रमांकावर फेकली आहे. सत्तेसाठी आता काय राजकीय समीकरणं जुळतात याकडे लक्ष लागलंय.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना तीन मुली आहेत. पहिली मुलगी कोतकरांच्या घरात, तर दुसरी जगतापांच्या घरात आणि तिसरी मुलगी शिवसेनेच्या गाडे परिवारात दिली आहे. त्यामुळे हे तीनही परिवार राजकारणात कोणत्याही पक्षाचे असले तरी राजकीय स्वार्थासाठी आतून एकत्रच असतात. यात नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत असतात ते आमदार शिवाजी कर्डिले.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात