‘छत्रपतींनी मागणी करायची नसते, तर आदेश द्यायचा असतो’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. सर्वच पक्षांनी जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे. या यात्रेचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे.

ही यात्रा उदयनराजेंच्या साताऱ्यात आली असता मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आतापर्यंत आमचे राजे अनेकदा माझ्यासोबत मंचावर उपस्थित होते पण आज आमचे राजे आमच्या मंचावर उपस्थित आहेत आह विधान केले आहे.

तसेच ‘इतिहासात जेव्हा जेव्हा एखाद्या मावळ्यांनं चांगलं काम केलं तेव्हा तेव्हा छत्रपतींनी पगडी घालून त्यांचं कौतुक केले. आज मला उदयनराजे यांनी पगडी घातली आणि शिवेंद्रसिंहराजे यांनी मला तलवार दिली, तसेच पुढे बोलताना छत्रपतींनी मागणी करायची नसते तर आदेश द्यायचा असतो हा मावळा तो नक्की पूर्ण करेल असं विधान केले आहे.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी  दोन्ही राजे आमच्याकडे कोणतीही अट टाकून आलेले नाहीत. या दोघांनी यादी दिली पण ती लोकांच्या कामांची होती. वैयक्तिक कामांची आजिबात दिली नाही. आज जे नेते उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे राजे यांच्यावर टीका करत आहेत, त्यांना लोक त्यांची जागा दाखवून देतील असं विधान केले आहे.