VIDEO : गुलालाची उधळण करत पुण्याचा राजा विसर्जन मिरवणूकीत मार्गस्थ.

पुणे : ढोल ताशांच्या गजरात हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा मानाचा तिसरा  गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रुप देण्याआधीच या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा गुलाल उधळणारं मंडळ अशी त्याची ख्याती आहे.

१८८७ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली. पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला मानाचे तिसरे स्थान आहे. पुण्याचा राजा म्हणून हा गणपतीची ओळख आहे. आठ किलो सोने आणि दोन किलो चांदीने अलंकृत अशा या गणेश मूर्तीची पारंपरिक पद्धतीने संपूर्ण सोपस्कार पार पाडत पूजा होते. पहिल्या दोन मानाच्या गणपतीनंतर रथातून मिरवणूक नेण्याचा मान या गणपतीला असतो.