किल्ले धारूर शहरामध्ये जागतिक महिला दिनानिमीत्त ‘अवयवदान’ केलेल्या महिलांना केले सन्मानित

किल्ले धारूर : शहरातील सकल मराठा समाज व कायाकल्प फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमीत्त अवयवदान केलेल्या महिलांना सन्मानित केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिभा नगर या परिसरातील महिलांनी अवयवदानाचा संकल्प करून शासकीय अर्ज केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील अवयव दान केलेल्या महिलांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्ष किल्ले धारूर तहसील कार्यालयाच्या तहसीलदार शिडोळकर मॅडम, प्रमुख पाहुणे वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या डॉ.सुप्रिया आदमाने मॅडम, मा.श्री.डाॅ.चेतन आदमाने साहेब, मा.श्री.डाॅ.राम शिनगारे साहेब, मा.श्री.दत्ताभाऊ गोंदणे साहेब हे होते.
अवयवदान केलेल्या मा.सौ.शुभांगी राम शिनगारे, मा.सौ.मंगल मुकुंदराव सावंत, मा.सौ.ताई बाबासाहेब जगताप मा.सौ.सुमित्रा दत्तात्रय शिनगारे, मा.सौ.पूजा सचिन कवडे, मा.सौ.शकुंतला बालासाहेब राऊत, कु.वैष्णवी राम शिनगारे यांचा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

यावेळी डॉ.चेतन आदमाने साहेब, डॉ.राम शिनगारे, डॉ.‌सुप्रिया आदमाने मॅडम, पुजा कवडे, कांचन गवळी, तहसीलदार शिडोळकर मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना या संकल्पाचे स्वागत करत सर्वांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय शिनगारे, सुत्रसंचलन स्नेहल शिनगारे, प्रदर्शन शुभांगी सवासे यांनी केले.यावेळी प्रतिभा नगर येथील सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

सकल मराठा समाज किल्ले धारूर व कायाकल्प फाऊंडेशन किल्ले धारूर चे सदस्य अनिल महाजन, अतुल शिनगारे, दिनेश कापसे, ईश्र्वर खामकर, रामेश्वर खामकर, विश्वानंद तोष्णिवाल, सुरेश गवळी, महेश गवळी, सचिन भालेकर, बाबासाहेब जगताप, सोळंके साहेब, जलदुत विजय शिनगारे, यश शिनगारे, राहुल शिनगारे उपस्थित होते.